माळेगांव पोलीसांनी हत्या करण्यासाठी चालवल्या नऊ गाईंची केली सुटका..
तीन आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक, महाप्राणी संरक्षण नुसार केला गुन्हा दाखल..

माळेगांव पोलीसांनी हत्या करण्यासाठी चालवल्या नऊ गाईंची केली सुटका..
तीन आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक, महाप्राणी संरक्षण नुसार केला गुन्हा दाखल..
बारामती वार्तापत्र
माळेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोहत्या होत असल्याची माहिती गोरक्षकाच्या माध्यमातून मिळाल्यानंतर माळेगांव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गाईचे हत्या केली जात असल्याचे आढळून आले.. काही गाई बांधून ठेवल्याचे आढळून आले यात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. बिलाल कुरेशी,अक्षय उर्फ बबलु विजय बागाव, आणि बापु कोंडीबा ठोंबरे सर्व बारामती अशी या आरोपीची नावे आहेत.. आरोपीवर गु.र.नं कलम 121/2026, भारतीय न्याय संहीता कायदा 2023 चे कलम 238, 325, 3(5), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (H), 11(1)(I), महा प्राणी संरक्षण अधि 1976 चे कलम 5, 5(क)(ब), 9, 11, अन्वये माळेगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी आरोपीच्या माध्यमातून तीन खिल्लारी देशीगाई, जर्सी लहान-मोठ्या अशा एकूण नऊ गाईंना गोशाळेत पाठविण्यात आले आहेत..






