राजकीय

बारामतीत वाढती गुन्हेगारी? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल

अजित पवार यांच्या नंतर विकास कामांवर प्रश्नचिंन्ह ?

बारामतीत वाढती गुन्हेगारी? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल

अजित पवार यांच्या नंतर विकास कामांवर प्रश्नचिंन्ह ?

बारामती वार्तापत्र

एकेकाळी शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या बारामतीत वाढत्या गुन्हेगारी, अंमली पदार्थांच्या कथित पुरवठा, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर आणि तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी पोलिस गस्त अपुरी पडत असून रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पोलिसांची उपस्थिती फारशी दिसून येत नाही. नावापुरते पेट्रोलिंग सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

काही भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, बारामती तालुका पोलिस स्टेशन परिसरातच मध्यरात्रीच्या सुमारास गांजाच्या विक्रीचे कथित प्रकार सुरू असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.

तसेच बसस्थानक परिसर आणि शहर पोलिस स्टेशनलगतच्या भागात प्रवाशांना लक्ष्य करून लूटमार आणि दहशत माजविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः ढावर आणि पाथर गँगच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, बसस्थानक परिसरात आणि संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, नाकाबंदी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण करण्याची मागणी होत आहे.

“रस्त्यांवर पोलिस दिसत नाहीत, टवाळखोर आणि गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहावे?” असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मात्र, या सर्व आरोपांबाबत पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नसून संबंधित आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या नंतर विकास कामांवर प्रश्नचिंन्ह ?

बारामती शहरात सुरु असलेल्या विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. एका संकुलात कामामध्ये दादांनी दाखवलेली मटेरियल ऐवजी सर्वात निकृष्ट साहित्य वापरले आहे हे काम करणारे कामगार स्वतः सांगत आहे. भल्या सकाळी खडा पोलिसांचा पहारा दिसत नसल्यामुळे गुन्हेगार बिनधास्त झाले आहे. अनेक ठिकाणच्या विकास कामाचे मटेरियल स्थानिक भंगार चोर यांनी तर गर्भ श्रीमंत चोरांनी चोरी केली असल्याचे समोर आले आहे याबाबत राजकीय आत्मचिंतन अपेक्षित आहे.

Back to top button