कृषी

मका पिकाकरिता वढाणे येथे शेतीशाळा संपन्न

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मका पिकाकरिता वढाणे येथे शेतीशाळा संपन्न

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे अंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे वढाणे येथे सन २०२६-२७ मधील नैसर्गिक शेती शेतकरी शेतीशाळा (पीक -मका) यांच्या प्रथम वर्गाचे आयोजन करण्यात आले.

सदरील शेती शाळेमध्ये शेतकरी निवड, बीज प्रक्रिया, बिजामृत निर्मिती तसेच मका पिकाच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगविषयी माऊली सहकारी शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुतवळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ व उप कृषी अधिकारी प्रशांत मोरे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केली. कार्यक्रमाचे नियोजन तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण चांदगुडे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button