शाळांची घंटा वाजली बारामतीच्या टेक्निकल विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थांचे स्वागत
विद्यार्थी खूप आनंदी

शाळांची घंटा वाजली बारामतीच्या टेक्निकल विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थांचे स्वागत
विद्यार्थी खूप आनंदी
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2026-2027 ची सुरुवात राज्यभर एकाच दिवशी म्हणजे 15 जून 2026 पासून होत आहे.
नवीन आलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 15 जून 2026 रोजी तर विदर्भात सोमवार दि. 22 जून 2026 पासून होणार आहे.
शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन प्रभारी प्राचार्य श्री सतीश पाचपुते, पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर तसेच उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. ढोल ताशा वाजवत विद्यार्थांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी खूप आनंदी होते.






