स्थानिक

बारामतीतील मएसोच्या देशपांडे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

योगसाधनेचे महत्व व योग दिनाचा हेतू प्रास्ताविकातून व्यक्त केला.

बारामतीतील मएसोच्या देशपांडे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

योगसाधनेचे महत्व व योग दिनाचा हेतू प्रास्ताविकातून व्यक्त केला.

बारामती वार्तापत्र 

‘जागतिक योग दिन’म.ए.सो.च्या कै.गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम यांनी योगसाधनेचे महत्व व योग दिनाचा हेतू प्रास्ताविकातून व्यक्त केला.
योग दिनानिमित्त श्री अनिल गावडे सर यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, त्रिकोणासन ,पद्मासन, बालासन, बद्धकोनासन या आसनांच्या प्रात्यक्षिकांचे सूत्र नियोजन केले.

त्यानंतर श्री दादासाहेब शिंदे सर यांनी प्राणायमात कपालभाती, अनुलोम-विलोम, क्लॅपिंग थेरपी, हास्ययोग, शांतीमंत्र यांचे प्रात्यक्षिक घेतले.

पाहुण्यांचा स्वागत व परिचय सौ मोहिनी देशपांडे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.डॉ.निलेश महाजन उपस्थित होते डॉ.निलेश महाजन आयुर्वेद व योगोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बारामती आयकॉन,योगभूषण पुरस्कार प्राप्त आहेत.तसेच संस्था व प्रशालेचे समन्वयक मा.श्री पुरुषोत्तम कुलकर्णी सर उपस्थित होते.

डॉ. निलेश महाजन यांनी अतिथी मनोगतात योगसाधना,प्राणायाम यांचे महत्त्व सांगितले. तसेच श्वसनाची प्राणायाम प्रात्यक्षिके घेतली व योगसाधनेच्या माध्यमातून आपले जीवन निरामय बनवा हा संदेश दिला.

अध्यक्षीय मनोगतात मा. मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग मॅडम यांनी व्यायाम, प्राणायाम याचबरोबर संतुलित आहार यांच्या माध्यमातून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडते व दीर्घायुष्य लाभते. ज्यामुळे आपण जीवनात येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलू शकतो,असे मत व्यक्त केले.

योग दिनानिमित्त प्रमुख पाहुणे मा. डॉ. निलेश महाजन सर, संस्था व प्रशालेचे समन्वयक मा.श्री पुरुषोत्तम कुलकर्णी सर, मा.मुख्याध्यापिका श्रीमती पूजा जोग मॅडम,मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले मॅडम, पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे सर ,श्री संदीप पवार सर ,सौ सुजाता पांडकर मॅडम ,डॉ.श्वेता जाधव,सर्व शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. श्री कुमार जाधव यांनी आभार व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रम क्रीडा विभागाद्वारे आयोजित करण्यात आला होता.सूत्रसंचालन श्री हरिदास राऊत सर यांनी केले.

Back to top button