कृषी

बारामती जळोची उपबाजारात कोथिंबीरीस शेकडा तीन हजार असा उच्चांकी दर

मार्केट कमिटी मार्फत शेतकरी व व्यापा-यांसाठी यापुढे विविध सुविधा पुरविल्या जातील.

बारामती जळोची उपबाजारात कोथिंबीरीस शेकडा तीन हजार असा उच्चांकी दर

मार्केट कमिटी मार्फत शेतकरी व व्यापा-यांसाठी यापुढे विविध सुविधा पुरविल्या जातील.

बारामती वार्तापत्र 

बारामती जळोची उपबाजार येथील फळे व भाजीपाला मार्केट मध्ये सोमवार दि. १३ जुलै रोजी आडतदार अभिजित जगताप यांचे आडतीवर मुढाळे गावाचे शेतकरी श्रीकांत गवळी यांचे कोथिंबिरला ३००० रूपये शेकडा असा उच्चांकी दर मिळाला.

श्री. गवळी यांना आतापर्यन्त बारामती व इतर मार्केट मध्ये कोथिंबीर विक्रीतुन जवळपास २० लाख रूपये मिळाले. कोथिंबिरीस चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

शेतक-यांनी बाजार आवारात फळे व भाजीपाला विक्रीस आणताना स्वच्छ व ग्रेडींग करून विक्रीस आणावा व आपला शेतमाल बाजार आवारात विक्री करावा असे आहवान सभापती विनायक गावडे व उपसभापती अरूण सकट यांनी केले आहे.

कोथिंबीरीस रेन पापई द्वारे शेततळ्यातुन पाण्याचे व खताचे योग्य नियोजन व वर्षभर सिझन प्रमाणे वेळेवर पेरणी व काढणी करीत असल्याने आणि गेली सात वर्षापासुन टप्याटप्याने पट्टा पद्धतीने लागवड करीत असल्याने चांगला दर मिळत आहे. तसेच बारामती मार्केटने पुरविलेल्या सुविधा, आडत्यांचे सहकार्य व वेळेत शेतकरी पट्टी, अचुक वजन आणि खरेदीदार मधील स्पर्धा तसेच स्थानिक व बाहेरील खरेदीदारांकडुन वाढती मागणी यामुळे चांगला दर मिळाला आहे असे शेतकरी गवळी यांनी सांगितले.

बारामती मार्केट कमिटी मार्फत शेतकरी व व्यापा-यांसाठी यापुढे विविध सुविधा पुरविल्या जातील. अधिक माहितीसाठी बारामती मार्केट कमिटीने तयार केलेल्या बारामती एपीएमसी ॲप चा वापर करावा असे प्रभारी सचिव हौसेराव कोकरे यांनी सांगितले.
जळोची मार्केट मध्ये शेतकरी श्रीकांत गवळी यांचा सत्कार करणेत आला.

बाजार समितीचे अधिकारी सुर्यकांत मोरे, दिपक जगताप, परवेज बागवान, संदीप झणझणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी फळे व भाजीपाला आडतदार संघटनेचे अध्यक्ष सईद बागवान, प्रदीप गदादे, किरण खोचरे, गणेश सस्ते, प्रणय रसाळ व इतर शेतकरी उपस्थित होते.

Back to top button