माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
व्याख्यान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
व्याख्यान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
बारामती वार्तापत्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे आणि नगरसेविका प्रतिभा विजय खरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, ज्येष्ठ नेते किरण गुजर, विविध नगरसेवक-नगरसेविका, बहुजन समाज पार्टीचे सचिव काळूराम चौधरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी “रशियात शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” या विषयावर प्रा. मनोज वाबळे यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, संघर्षमय जीवन आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
नगराध्यक्ष सचिन सातव, काळूराम चौधरी, जय पाटील, शुभम अहिवळे आणि जालिंदर सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या, न्यायाच्या आणि परिवर्तनाच्या विचारांचा समाजाने अंगीकार करावा, असे आवाहन केले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदा जयंती मोठ्या जल्लोषात न साजरी करता व्याख्यान, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विधायक उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आल्याची माहिती आयोजक बिरजू मांढरे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत रहिवासी संघ, साईच्छा सेवा ट्रस्ट, श्रीहरी भाऊ तेलंगे मित्र परिवार, भाऊसाहेब मांढरे सामाजिक संस्था आणि लहुजी वस्ताद दहीहंडी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.







