इंदापूर

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत संजय राऊतांचा जाहीर निषेध; पोस्टरला जोडे मारून माळी समाज आक्रमक

पोस्टरला जोडे मारून आंदोलन

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत संजय राऊतांचा जाहीर निषेध; पोस्टरला जोडे मारून माळी समाज आक्रमक

पोस्टरला जोडे मारून आंदोलन

इंदापूर;प्रतिनिधि

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी कथितरीत्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे माळी समाजाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच “जयकुमार गोरे यांच्या विरोधातील वक्तव्यांचा निषेध असो” अशा घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी माळी समाजाच्या प्रतिनिधींनी मंत्री जयकुमार गोरे हे समाजाचा मान आणि स्वाभिमान असल्याचे सांगत, त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यात विकासकामांवर भर दिला असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच, भविष्यात जयकुमार गोरे यांच्याविरोधात अवमानकारक किंवा चुकीची वक्तव्ये केल्यास माळी समाज त्याला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, या आंदोलनामुळे निमगाव केतकी परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून या निषेधाची चर्चा परिसरात सुरू आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D