“अजित दादांची सावली, सुनेत्रावाहिनी आमची माऊली!”; पुष्पवृष्टी करत रणरागिणीचे बारामतीत जल्लोषात स्वागत!
“बारामतीची रणरागिणी!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

“अजित दादांची सावली, सुनेत्रावाहिनी आमची माऊली!”; पुष्पवृष्टी करत रणरागिणीचे बारामतीत जल्लोषात स्वागत!
“बारामतीची रणरागिणी!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
बारामती वार्तापत्र
‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामतीत आगमन झाले. यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सुनेत्रा पवार बारामतीत दाखल होताच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी “अजित दादांची सावली, सुनेत्रावाहिनी आमची माऊली!”, “महाराष्ट्राची रणरागिणी, सुनेत्रावाहिनी!” तसेच “बारामतीची रणरागिणी!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
गेल्या काही दिवसांपासून ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून बारामतीसह विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. पुष्पवृष्टी, घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.
या स्वागताच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याप्रती आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या बारामती दौऱ्याची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या स्वागत सोहळ्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी काळात या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






