स्थानिक

बारामतीत आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर योजनेंतर्गत पात्र रुग्णांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यात येते.

बारामतीत आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर योजनेंतर्गत पात्र रुग्णांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यात येते.

बारामती वार्तापत्र 

एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा बारामती तालुका व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे ही योजना कार्यान्वित असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका आणि आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड अद्ययावत असणे गरजेचे असून, शिधापत्रिका १२ अंकी आरसी क्रमांकासह ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

शिधापत्रिकेवर १२ अंकी RC क्रमांक नसल्यास किंवा रुग्णाचे नाव शिधापत्रिकेत नसल्यास, आरोग्य मित्राच्या माध्यमातून तहसीलदारांचा दाखला घेऊन तो तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर योजनेंतर्गत पात्र रुग्णांना आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्यात येते. या कार्डच्या आधारे नागरिकांना योजनेचा लाभ घेता येतो.
नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करून शिधापत्रिकेचा १२ अंकी क्रमांक अद्ययावत करावा. तसेच गुगल प्ले स्टोअर वरील आयुष्मान ॲप मधील Beneficiary पर्याय किंवा NHA Beneficiary Portal या माध्यमातून आयुष्मान कार्ड स्वतः काढावे अथवा संबंधित रुग्णालयातील आरोग्य मित्राकडूनही आयुष्मान कार्ड मिळवता येईल, असेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.

Back to top button