स्थानिक

बारामतीतील न्यायालयाच्या गेटसमोर ॲक्टिव्हाला अचानक आग; काही काळ खळबळ

सायंकाळी 4:32 वाजता पेट घेतल्याची घटना घडली

बारामतीतील न्यायालयाच्या गेटसमोर ॲक्टिव्हाला अचानक आग; काही काळ खळबळ

सायंकाळी 4:32 वाजता पेट घेतल्याची घटना घडली

बारामती वार्तापत्र 

बारामती न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज जाकीय शेख यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक सायंकाळी 4:32 वाजता पेट घेतल्याची घटना घडली. न्यायालयाच्या गेटसमोरच दुचाकीला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.

दुचाकीला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुचाकीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे आग लागली की अन्य कारणामुळे, याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेतली जात आहे.

न्यायालयाच्या मुख्य गेटसमोर घटना घडल्याने काही काळ नागरिकांची आणि ये-जा करणाऱ्यांची धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.नगर परिषदेचे अग्निशामन अधिकारी निखिल कागडा. फायर मन प्रदीप, सुशील प्रज्वलित यांनी आग विझवली आहे.

Back to top button