स्थानिक

पार्किंगच्या वादातून उपनगराध्यक्षांना धक्काबुक्की?; बारामतीत खळबळ

हॉटेल लिलाजसमोरील प्रकार; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा वाद टळला

पार्किंगच्या वादातून उपनगराध्यक्षांना धक्काबुक्की?; बारामतीत खळबळ

हॉटेल लिलाजसमोरील प्रकार; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा वाद टळला

बारामती वार्तापत्र 

हॉटेलसमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीसोबत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हॉटेल लिलाज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉटेल लिलाजसमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून अनिकेत जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) आणि उपनगराध्यक्षा यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर उपनगराध्यक्षा यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील वाद टळला.

दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात असून, वाद नेमका कोणत्या कारणावरून आणि कोणत्या परिस्थितीत वाढला, याचा तपास सुरू आहे. घटनेतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

या प्रकारामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Back to top button