मुंढेंच्या कारवाईला शेतकऱ्यांची सलामी!; बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत प्रतिमेला दुग्धाभिषेक
शेतकऱ्यांकडून सार्वजनिकरित्या कौतुक

मुंढेंच्या कारवाईला शेतकऱ्यांची सलामी!; बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत प्रतिमेला दुग्धाभिषेक
शेतकऱ्यांकडून सार्वजनिकरित्या कौतुक
डोर्लेवाडी;प्रतिनिधि
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केल्याने दुधाला चांगला भाव मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
या कारवाईचे स्वागत करण्यासाठी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.
दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याने प्रामाणिकपणे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुंढे यांचे समर्थन केले.
यावेळी शेतकऱ्यांनी “तुकाराम मुंढे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा देत त्यांच्या कारवाईला पाठिंबा दर्शविला. दूध व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि भेसळीला आळा बसावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
डोर्लेवाडीतील या अनोख्या उपक्रमाची परिसरात चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या कारवाईचे शेतकऱ्यांकडून सार्वजनिकरित्या कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.






