माळेगाव बु

माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दमदार पाऊस! संचालक मंडळ पोहोचले नीलकंठेश्वराच्या चरणी!

विक्रमी गाळपासाठी आशा पल्लवित!

माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दमदार पाऊस! संचालक मंडळ पोहोचले नीलकंठेश्वराच्या चरणी!

विक्रमी गाळपासाठी आशा पल्लवित!

बारामती वार्तापत्र

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या आगमनामुळे शेतकरी, कारखान्याचे सभासद आणि कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने कारखान्याचे ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वराला अभिषेक करण्यात आला.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर कॅनॉलला पाणी सोडण्याचीही तातडीची गरज होती. अशा परिस्थितीत सोमवारी पहाटे संपूर्ण बारामती तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पावसाच्या आगमनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळेगाव कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री. धनंजय लिंबोरे यांच्या हस्ते श्री नीलकंठेश्वराला अभिषेक करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन नितीनदादा शेंडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, संचालक स्वप्निल अण्णा जगताप, रतनदादा भोसले, जयपाल तात्या देवकाते, देविदास गावडे, मच्छिंद्र मुलमुले, स्टोअर कीपर सुरेश बापू देवकाते, कामगार संचालक शेखर आप्पा जगताप, प्रमोद जगताप, नीलकंठेश्वर संघाचे नितीन देवकाते, ज्येष्ठ सभासद बापू धुमाळ, गणू तात्या जामदार, लालासाहेब गावडे पाटील तसेच एकता सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष नानासो गावडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संचालिका ज्योतीताई मुलमुले यांचे पती ॲड. मच्छिंद्र मुलमुले यांनी उपस्थितांना पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला.

निसर्गाची साथ मिळाली तर विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट!

यावेळी बोलताना कारखान्याचे व्हाइस चेअरमन नितीनदादा शेंडे म्हणाले, “कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाची अत्यंत आवश्यकता होती. आता पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. निसर्गाने अशीच साथ दिली, तर यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त आणि विक्रमी गाळप करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.”

पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, आगामी गाळप हंगामासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नीलकंठेश्वराच्या चरणी अभिषेक करून संचालक मंडळाने पावसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Back to top button