स्थानिक

बाळासाहेबांच्या छायाचित्राची विटंबना! बारामतीत शिवसैनिक आक्रमक; भिगवण चौकात आंदोलन, दोषींना अटक करण्याची मागणी!

शिवसेना-युवसेनेसह काँग्रेसही आंदोलनात सहभागी!

बाळासाहेबांच्या छायाचित्राची विटंबना! बारामतीत शिवसैनिक आक्रमक; भिगवण चौकात आंदोलन, दोषींना अटक करण्याची मागणी!

शिवसेना-युवसेनेसह काँग्रेसही आंदोलनात सहभागी!

बारामती वार्तापत्र 

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद बारामतीत उमटले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी भिगवण चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या छायाचित्राची विटंबना झाल्याच्या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची केवळ औपचारिक चौकशी न करता सखोल तपास करून संबंधित दोषींना शोधावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यासंदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. घटनेमागील नेमके कारण शोधून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

या निषेध आंदोलनात शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला.

बाळासाहेबांच्या छायाचित्राची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणार का? याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button