सोमेश्वर

सोमेश्वरचा ऊसदराचा धमाका! ३,९५१ रुपयांची पहिली उचल; अनुदानासह ४,३०१ रुपये!

सभासदांसह गेटकेनधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

सोमेश्वरचा ऊसदराचा धमाका! ३,९५१ रुपयांची पहिली उचल; अनुदानासह ४,३०१ रुपये!

सभासदांसह गेटकेनधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

बारामती वार्तापत्र 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३,९५१ रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. अनुदानासह ही रक्कम प्रतिटन ४,३०१ रुपयांपर्यंत जाणार आहे. कारखान्याच्या इतिहासातील ही आजवरची सर्वाधिक पहिली उचल असून, पुणे जिल्ह्यातील चालू हंगामातील सर्वाधिक जाहीर दर असल्याचे सांगण्यात आले.

कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि उपाध्यक्ष संग्राम सोरटे यांनी रविवार (दि. २२ नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून, सभासदांसह गेटकेनधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यापूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३,९०० रुपयांचा दर जाहीर केला होता. सातारा जिल्ह्यातील बहुतांश खासगी साखर कारखान्यांनीही प्रतिटन ३,९०० रुपये दर निश्चित केला आहे. तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३,५०१ रुपये दर जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याने ३,९५१ रुपयांची पहिली उचल जाहीर करत ऊसदराच्या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, सभासदांसह गेटकेनधारक शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याने ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

३,९५१ रुपयांची पहिली उचल आणि अनुदानासह ४,३०१ रुपयांपर्यंत पोहोचणारा दर यामुळे सोमेश्वर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Back to top button