राजकीय

बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर युगेंद्र पवार आक्रमक! पोलिसांना थेट निवेदन; पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी!

डीवायएसपी चैतन्य कदम यांच्याशी चर्चा; संवेदनशील भागांत नियमित गस्त आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही भूमिका!

बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर युगेंद्र पवार आक्रमक! पोलिसांना थेट निवेदन; पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी!

डीवायएसपी चैतन्य कदम यांच्याशी चर्चा; संवेदनशील भागांत नियमित गस्त आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही भूमिका!

बारामती  वार्तापत्र 

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि. २६) उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांची भेट घेत थेट पोलीस प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली.

शहरातील विविध भागांत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवा, संवेदनशील परिसरात नियमित गस्त घाला आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

विशेषतः गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांत पोलिसांची उपस्थिती वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

‘बारामतीकरांची सुरक्षितता महत्त्वाची!’

सर्वसामान्य नागरिकांना निर्भयपणे वावरता आले पाहिजे. शहरात कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी पोलीस गस्त आवश्यक असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी राजेंद्र जगताप, आरती शेंडगे, वनिता बनकर, सुभाष ढोले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आता प्रश्न एकच! बारामतीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्या ठोस उपाययोजना करणार? शहरातील पेट्रोलिंग वाढणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button