इंदापूरच्या ‘नवरदेवाला ‘ पंतप्रधानांच्या शुभेच्छा
तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात लग्नाची चर्चा
बारामती वार्तापत्र
विवाहाची निमंत्रण पत्रिका देऊन शुभ कार्यात सामील केल्याबद्दल धन्यवाद, तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी यावी, पती-पत्नीतील प्रेम वाढावे याबद्दल सौभाग्यपूर्ण जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, या शुभेच्छा आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
सराफवाडी तालुका इंदापूर येथील दीपक व वैभवी यांच्या लग्नासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीपक यांचे वडील नानासाहेब लक्ष्मण धनवडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पत्रिका दिली होती. त्यावर नरेंद्र मोदींनी दीपक व वैभवी यांना पत्ररूपाने शुभेच्छा दिल्या आहेत. तसे पत्र 24 डिसेंबरला धनवडे कुटुंबियांना मिळाल्याने लग्नघरात आनंद द्विगुणित झाला आहे .
दीपक धनावडे मूळचे सराफवाडी तालुका इंदापूर येथील रहिवासी असून ते मावळ तालुक्यात तलाठी पदी काम करतात दीपक व वैभवी यांचा विवाह 21 तारखेला इंदापूर येथील निकिता लॉन्स येथे झाला. दीपकच्या वडिलांनी 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांना पत्रिका पाठवली होती. मात्र एका ग्रामीण भागातील व्यक्तीचे लग्नाचे निमंत्रण स्वीकारून पत्रव्यवहार करून शुभेच्छा दिल्या त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचेही कौतुक होत आहे.