इंदापूर पोलीस स्टेशनकडून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांचा प्रशंसापत्रक देऊन सन्मान
तपासात पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलातील तरुणांची उल्लेखनीय कामगिरी

इंदापूर पोलीस स्टेशनकडून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांचा प्रशंसापत्रक देऊन सन्मान
तपासात पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलातील तरुणांची उल्लेखनीय कामगिरी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पोलीस कार्यक्षेत्रात घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकामी उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी,पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलातील जवानांना शुक्रवारी (दि.१२) इंदापूरचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
इंदापूर पोलिसांनी मागील काही दिवसांमध्ये पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध चोरीच्या तसेच इतर घटना उघडकीस आणत दबंग कामगिरी केली आहे. सदरच्या गुन्ह्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलातील युवकांनी मदत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.त्यामुळे या सर्वांच्या प्रशंसनीय कामाबद्दल इंदापूर पोलीस स्टेशनकडून प्रशंसापत्रक देऊन सन्मान करण्यात आला.प्रसंगी उपस्थित सर्वांना दिवाळी फराळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक तयुब मुजावर,पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अस्ताक अली काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तांबे,पो.ह.पवन भोईटे,पो.ना.लक्ष्मण साळवे,पो.ना.सुनील नगरे,पो.ह.नानासो आटोळे,पो.शि.मनोज गायकवाड,पो.ह.शुभांगी खंडागळे,पो.ह.निर्मला पारेकर,पो.ह.ए. डी खैरे, पोलीस अधिकारी,कर्मचारी,पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलातील युवक आदी उपस्थित होते.