स्थानिक

राष्ट्रवादी काँग्रेस भवन बारामती याठिकाणी राबविला लोकाभिमुख अभिनव उपक्रम

सोमवारी व गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० यावेळेत राबविला जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस भवन बारामती याठिकाणी राबविला लोकाभिमुख अभिनव उपक्रम

सोमवारी व गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० यावेळेत राबविला जाणार

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका व शहरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार बारामतीतील नागरिकांच्या स्थानिक अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी हा लोकाभिमुख अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
गुरुवार ता.२० ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झालेल्या उपक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील व एकात्मिक समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती येथे उपस्थित राहुन अनेक लोकांच्या अडीअडचणी व समस्या तालुकास्तरावर तत्काळ सोडवल्या व काही निवारणासाठी आश्वात केल्या.
दर गुरुवारी होणाऱ्या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून अनेक नागरिक आपापल्या समस्या व अडचणी मांडत आहेत. तसेच यापुढे हा उपक्रम दर आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० यावेळेत राबविला जाणार असून या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील,एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर,शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे,सभापती निता फरांदे,विविध संस्थांचे पदाधिकारी व शासकीय कमिटीचे अध्यक्ष,सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य,मदत व मार्गदर्शन करणार आहेत.तरी तालुका व शहरातील नागरिकांनी संपर्क साधावा.
सदरचा उपक्रम हा दर आठवड्याचा सोमवार व गुरुवार या दोन्ही दिवशी चालू राहणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी दिली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D