क्राईम रिपोर्ट

बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन;चेन स्नॅचिंगमधील ₹१.४० लाखांचे मंगळसूत्र फिर्यादी महिलेला परत

नागरिकांकडून कौतुक

बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन;चेन स्नॅचिंगमधील ₹१.४० लाखांचे मंगळसूत्र फिर्यादी महिलेला परत

नागरिकांकडून कौतुक

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलिसांच्या तत्पर आणि उत्कृष्ट तपासामुळे चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील फिर्यादी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले सुमारे ₹१ लाख ४० हजार किमतीचे, १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर आज संबंधित फिर्यादी महिलेला परत करण्यात आले.
मंगळसूत्र परत मिळाल्यानंतर फिर्यादी महिलेने बारामती तालुका पोलिसांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने नागरिकांमध्येही विश्वास वाढला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासी अंमलदार रचना काळे आणि मुद्देमाल कारकून भारती खंडागळे यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मंगळसूत्र फिर्यादी महिलेकडे सुपूर्द केले.
बारामती तालुका पोलिसांच्या या प्रभावी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गुन्ह्यांचा छडा लावून फिर्यादींना न्याय मिळवून देण्याच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.

Back to top button