स्थानिक

बारामती बाजार समितीचा शिर्सुफळ येथे नवीन शेळी-मेंढी बाजार सुरू

पहिल्या दिवशी ४५ शेळी मेंढीची आवक झाली तर २० मेंढ्याची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल

बारामती बाजार समितीचा शिर्सुफळ येथे नवीन शेळी-मेंढी बाजार सुरू

पहिल्या दिवशी ४५ शेळी मेंढीची आवक झाली तर २० मेंढ्याची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल

बारामती वार्तापत्र

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामपंचायत शिर्सुफळ यांची मागणी विचारात घेऊन शिर्सूफळ ता. बारामती जि. पुणे येथे नव्याने शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ बारामती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व सरपंच सौ. जुईताई हिवरकर यांचे हस्ते संपन्न झाला.

बारामती बाजार समितीने राबविलेला हा स्तुत्य उपक्रम असुन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेली सुचना व ग्रामपंचायतीची अनुमती यामुळे गावाचे विकासात भर पडणार आहे असे सभापती यांनी चर्चे वेळी विचार व्यक्त केले.

समितीने सुरू केलेल्या या बाजारामुळे गावातील व परिसारातील शेतक-यांची चांगली सोय झाली असुन भविष्यात शिर्सुफळ गावात बाजार समितीचा पेट्रोल पंप असावा अशी मागणी केली. त्यामुळे परिसरातील लोकांची व शेतक-यांची सोय होईल असे मत जुईताई हिवरकर यांनी भाषणात व्यक्त केले.

यावेळी आप्पासो आटोळे यांनी समितीच्या उपक्रमाचे स्वागत करून त्याचा फायदा पंचक्रोशीतील लोकांना नक्की होईल याबाबत समितीस पुर्ण सहकार्य राहील असे सांगितले.
ग्रामीण भागात शेळी मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय असुन त्यावर अर्थार्जन सुरू असल्याने त्याचा विचार करून आणि शेतकऱ्यांना गावाच योग्य बाजारपेठ व विक्री व्यवस्था व्हावी म्हणून हा बाजार सुरू करण्यात आला आहे. यामुळे मध्यस्थ कमी होऊन शेतक-यांना व विक्रेत्यांना थेट खरेदीदारांशी संपर्क साधता येणार आहे, परिणामी चांगला दर मिळण्याची संधी निर्माण होणार आहे असे मत माजी सभापती सुनिल पवार यांनी मांडले.

पहिल्या दिवशी ४५ शेळी मेंढीची आवक झाली तर २० मेंढ्याची विक्री होऊन साधारण लाखाचे आसपास उलाढाल झाली. शेतकरी बाळु किसन हिवरकर यांचे मेंढ्यास रू. १८०००/- दर मिळाला तर विनोद गुळुमकर यांनी खरेदी केला. बाळु हिवरकर, महादेव म्हेत्रे, माणिक कांबळे या शेतक-यांनी शेळी मेंढी विक्रीस आणल्या होत्या. यापुढे प्रत्येक शुक्रवारी शेळी मेंढी बाजार सुरू राहील. भविष्यात बाजारात विविध सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे पशुपालक आणि व्यापारी यांनी बाजारात शेळी मेंढी विक्रीस आणावी असे आवाहन सचिव अरविंद जगताप केले आहे.
यापुर्वी शिर्सुफळ व परिसरातील शेतकरी शेळी मेंढी विक्रीसाठी यवत, भिगवण, काष्टी या ठिकाणी जात होते. त्यांची सोय बारामती तालुक्यात व्हावी या उद्देशाने नेत्यांचे मार्गदर्शनाखाली शेळी मेंढी सुरू करणेत आला असल्याचे सभापती यांनी चर्चेत सांगितले.
यावेळी उपसरपंच सौ. हिराबाई झगडे, दुध संघाचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी झगडे, बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र खलाटे, माजी सभापती अनिल हिवरकर, बाजार समितीचे सदस्य बापुराव कोकरे, सतिश जगताप, संतोष आटोळे, अरूण सकट तसेच दिलीप परकाळे, विलास कदम, अतुल हिवरकर,गणेश सातपुते, सोमनाथ हिवरकर, विजय शिंदे, आप्पासो झगडे, पोपट धवडे, सुरज हिवरकर, आणि परिसरातील शेतकरी, खरेदीदार व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन रमेश हिवरकर तर सदाशिव आटोळे माजी उपसरपंच यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!