बारामतीत महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काङराने सन्मान
पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह आल्याबद्दल जनमित्रांचे कौतुक

बारामतीत महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काङराने सन्मान
पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह आल्याबद्दल जनमित्रांचे कौतुक
बारामती वार्तापत्र
महावितरणच्या बारामती परिमंडळात ऊर्जा भवन, बारामती येथे १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामती, सातारा व सोलापूर मंडळातील ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दैनंदिन थेट ग्राहकांच्या संपर्कात येणारे जनमित्र हे महावितरणचा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले.
याप्रसंगी यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, रमेश कदम, संजय सोनवलकर,अमित बारटक्के यांच्यासह अधिकारी – कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन व्यवस्थापक (मासं) रामकृष्ण वाघमोडे तर आभारप्रदर्शन प्रमुख लिपीक केतन मकरे यांनी केले. उत्तम गायकवाड, प्रवीण माने, अक्षय माळी व अभय पांडे या जनमित्रांनी उस्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. गत आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सातारा विभाग, मंगळवेढा, सातारा शहर व शिक्रापूर उपविभाग व निंबोणी (पंढरपूर विभाग), पवई नाका २ (सातारा विभाग), बारामती ग्रामीण १ या शाखा कार्यालयास पुरस्कृत करण्यात आले.
पुढे बोलताना पेठकर यांनी पुरस्कारप्राप्त तांत्रिक कामगारांचे कौतुक करून दैनंदिन कामकाजात सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सुचित केले. जनमित्र हे महावितरणचा आरसा असून कंपनीची प्रतिमा निर्मिती त्यांच्यावर अवलंबून आहे. तेंव्हा ग्राहकांशी सौजन्यपूर्वक वर्तन ठेवून सेवा बजावावी. सर्वांगिण विकासात वीजेचा मोलाचा वाटा आहे. तेंव्हा या वीजक्षेत्रात काम करण्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेता कंपनी व ग्राहकांच्या हीतासाठी, अनाधिकृत वीजवापर नियंत्रणात आणणे हे लक्ष्य प्रत्येकाने ठेवावे. वीज हानी कमी करणे, महसूलाची वसूली करणे व ग्राहकांना अखंडित सेवा देणे या तीन जबाबदाऱ्या सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे पेठकर यांनी स्पष्ट केले.
सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनी कौतुक व्हावे, ही एक मानवी अंत:स्थ भावना आहे. या भावनेची पुर्ती प्रेरणादायी ठरते. ते कार्य या पुरस्कार सोहळ्याने पार पाडले आहे, असा विचार मांडला. तसेच पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह आल्याबद्दल जनमित्रांचे कौतुक केले. जनमित्रांच्या मनोगतातून कंपनीबद्दल आस्था प्रकट झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार प्राप्त तांत्रिक कामगार
बारामती मंडळ :उत्कृष्ट यंत्रचालक – संजय कुतवळ, पोपट शिंदे, दादा दगडे उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- कैलाश ताटे, नागेश वाबळे, योगेश तावरे, बिरुदेव चव्हाण, संदीप देवकर, स्वप्नील सोनवणे, ज्ञानेश्वर अहिरकर, झियाउददीन शेख, उत्तम गायकवाड, स्वप्नील भगत, रणजित बाबर, राजेंद्र जगताप
सातारा मंडळ : उत्कृष्ट यंत्रचालक- संजय निकम, रविंद्र जाधव, प्रशात सुर्यवंशी, सूर्यकांत कुंभार, राजेंद्र जाधव उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- यशवंत हाके, संतोष महाडीक, अविनाश जाधव, गणेश घाडगे, निलेश बर्गे, शिवाजी शेवाळे, बेबी चव्हाण, संदिप देसाई, अक्षय लोकरे, विपुल वंजारे, दत्तात्रय कारंडे, संजय मोरे, अभिजीत चोरमले, सुनिल जाधव, सुर्यकांत भाटे, रामकृष्ण पाटील, अक्षय अरुण पाटील, राहुल इंगळे, अभय पांडे, गणेश जाधव, विजय चव्हाण, महेश लोखंडे
सोलापूर मंडळ : उत्कृष्ट यंत्रचालक गौरव कर्चे, विजयकुमार शिंदे, वासुदेव जाधव, किरण पाटील, सुभाष वासुतकर उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- महादेव पिसे, अवधुत सरर्जनकर, समाधान जगताप, सुनील आंधळे, संदीप देठे, विनोद ढगे, अमोल आयवळे, अमोल उघडे, महेश पाटील, रविंद्र बोंदर, प्रदीप परचंडे, अमोल गवळी, आण्णासाहेब लवटे, राहुल नाईकवाडी, आदित्य गणगे, सागर हाके, नवनाथ कांबळे, तानाजी हेजेराव, अक्षय माळी, भाऊसाहेब कदम, प्रविण माने, अंबिका कुंभार, तानाजी सुरवसे, जनक पवार, भिमाशंकर उमराणे, सतीश कोणजी, आकाश जाधवर, रविराज कोळी






