
बारामती मध्ये रामनवमी उत्साहात साजरी
विविध मंडळे व संस्थांनी पाणी व सरबताचे वाटप केले
बारामती वार्तापत्र
सालाबाद प्रमाणे रामनवमी उत्सव समिती , बारामती तर्फे रामनवमी निमित्त शोभा यात्रेचे दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी बारामती शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते .
शोभायात्रा पारंपारिक पालखी सोहळा पद्धतीने काढण्यात आली .मराठा नगर येथून श्री प्रभू श्रीरामाच्या रथाचे व पालखीचे प्रस्थान ठीक संध्याकाळी ६:०० वाजता श्री व सौ राजाभाऊ कदम यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या रथाचे पूजन व आरती करून झाले.
सदर शोभायात्रा बारामती शहरातील आप्पासाहेब पवार मार्गावरून गुणवडी चौक मार्गे श्रीराम मंदिर ,राम गल्ली येथे पालखीचे पूजन व आरती करण्यात आले त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली गांधी चौक – सुभाष चौक – भिगवन चौक – इंदापूर चौक मार्गे गुणवडी चौक येथील मारुती मंदिरामध्ये मारुतीरायाची आरती बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास नाळे यांच्या हस्ते घेऊन शोभायात्रेचा समारोप करण्यात आला .
सदर शोभा यात्रेमध्ये हलगी पथक , ढोल पथक तसेच वीर हनुमान व प्रभू श्रीरामांचे भव्य मूर्ती असलेले ट्रेलर होते तसेच बारामती शहरांमधील सर्व राम भक्तांनी मिरवणुकीस अभूतपूर्व उपस्थिती लावली होती तसेच शोभायात्रेच्या मार्गावर बारामती शहरातील विविध मंडळे व संस्थांनी पाणी व सरबताचे वाटप केले बारामती शहरांमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रामनवमीच्या निमित्त आयोजित करण्यात आलेली शोभायात्रा पार पडली सदर शोभा यात्रेचे आयोजन राम नवमी उत्सव समिती, बारामती मार्फत करण्यात आले होते.