राष्ट्रवादीने प्रदीप गारटकर यांना योग्य संधी द्यावी
इंदापुरात सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा

राष्ट्रवादीने प्रदीप गारटकर यांना योग्य संधी द्यावी
इंदापुरात सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरात शनिवारी (दि.15) मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या नगरविकास, परिवहन, अल्पसंख्यांक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली, सर्वपक्षीय जिल्ह्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व पक्षातील प्रमुखांनी, तसेच इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी, प्रदीप गारटकारांना आमदारकी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे. त्यांना पक्षाने न्याय द्यावा. अशी मागणी सभेतच केली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील अजित पवार यांनी गारटकर यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. यानंतर पक्षाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले. पक्ष संघटना चालवण्याचे बाळकडू पतीत पावन संघटनेपासून गारटकर यांना मिळाले होते. यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, मनसे नेते सुधीर पाटसकर तसेच सर्वच पक्षाच्या नेत्यांनी गारटकरांना संधी पक्षाने दिली पाहिजे, असे एकदिलाने म्हटले.