रिपब्लिकन पक्षाचा इंदापूर येथे निषेध मोर्चा
भिमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे

रिपब्लिकन पक्षाचा इंदापूर येथे निषेध मोर्चा
भिमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे
इंदापूर; प्रतिनिधी
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच भिमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणी करिता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरातून प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार जीवन बनसोडे यांना शुक्रवार (दि.13) निवेदन देण्यात आले.
हे कृत्य करणाऱ्या आरोपीवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर जाहीर करावे. यापुढे महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे व पोलिस संरक्षण पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कार्यवाही न झाल्यास व भिमसैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येतील, असाही इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार बनसोडे यांनी निवेदन स्वीकारले.