दि. १८ एप्रिल रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे शिवछत्रपती राज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचलित अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका रेखा अक्षय नरुटे-धनगर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा बेसबॉलसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
झाला.
२०२३-२४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बेसबॉल खेळामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल तसेच त्यांनी या खेळामध्ये
मिळविलेली पदके यांचा विचार करून संपूर्ण राज्यातून बेसबॉल खेळासाठी महिला खेळाडू म्हणून रेखा नरुटे-धनगर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जवाहर शहा(वाघोलीकर),सचिव श्री. मिलिंद शहा(वाघोलीकर), अनेकान्त स्कूलचे चेअरमन श्री. चंद्रवदन शहा(मुंबईकर) व शाळा व्यवस्थापन समिती तसेच स्कूलच्या प्राचार्या यांनी रेखा
नरुटे-धनगर यांचे अभिनंदन केले आहे.