आपला जिल्हा

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही घेतली उडी

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही घेतली उडी

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर :प्रतिनिधि

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईलच्या हट्टावरून नाराज झालेला मुलगा डोंगरावर पोहोचला होता.

मुलगा टोकावर गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेतली. मात्र, यावेळी त्यांचाही तोल जाऊन ते खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर आईनेही टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वाळूज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे मुलांशी संवाद, त्यांच्या भावनिक गरजा आणि मोबाईल तसेच सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या अपेक्षा याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, घटनेमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

एका कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी संकटाने परिसरात शोककळा पसरली असून, घटनेबाबत अधिकृत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

Back to top button