आपला जिल्हा

बारामतीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले नैसर्गिक मृत्यू की घातपात? सखोल चौकशीची मागणी!

तरुणीच्या आई-वडिलांना बाहेरगावी जाण्यासाठी दौंड रेल्वे स्थानकावर सोडले.

बारामतीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले नैसर्गिक मृत्यू की घातपात? सखोल चौकशीची मागणी!

तरुणीच्या आई-वडिलांना बाहेरगावी जाण्यासाठी दौंड रेल्वे स्थानकावर सोडले.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील सूर्यनगरी जलोची (तरुणीचे मूळ गाव कन्हेरी) परिसरात राहणाऱ्या एका तरुणीच्या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाले असून, हा मृत्यू नैसर्गिक आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संबंधितांकडून व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांच्या विवाहाचा निर्णय घेण्यात आला होता. तरुणीच्या आई-वडिलांना बाहेरगावी जाण्यासाठी दौंड रेल्वे स्थानकावर सोडून दिल्यानंतर बारामतीतील वजारवाडी येथे हॉटेल मधून जेवण करून ती तरुणासोबत हरीकृपानगर परिसरातील त्याच्या घरी गेल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत्यूच्या कारणाबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असून, काही नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित तरुणीच्या नातेवाईकांमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असल्याने प्रकरण दडपले जात असल्याची चर्चा काही स्तरावर सुरू असल्याचे समजते.

मात्र या दाव्याला दुजोरा देणारी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणांनीही याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय नोंदी, घटनास्थळावरील पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिकृत तपास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Back to top button