क्राईम रिपोर्ट

महिला उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; सलग तीन गंभीर घटनांनी वाढवली चिंता

संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे.

महिला उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; सलग तीन गंभीर घटनांनी वाढवली चिंता

संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे.

बारामती वार्तापत्र 

राज्यात महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षिततेवर भर दिला जात असताना बारामती शहर व तालुक्यात अल्पावधीत घडलेल्या तीन गंभीर घटनांमुळे महिला व बालिकांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलीशी कथित लैंगिक गैरवर्तन, एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा अशा सलग घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

बारामती शहरात आठ वर्षीय मुलीशी कथित लैंगिक गैरवर्तन झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांमुळे महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नागरिकांकडून शहर व ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढविणे, संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, महिला तक्रारींवर तातडीने कारवाई करणे आणि गंभीर गुन्ह्यांचा जलद तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बेकायदेशीर व्यवसायांवरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, बारामती शहर व तालुक्यात गुटखा, मटका, अवैध दारू आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांचे जाळे वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. या प्रकारांवर प्रभावी कारवाईची मागणी नागरिकांकडून होत असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण मोहिमा राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सलग घडलेल्या घटनांमुळे महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण या मुद्द्यांवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Back to top button