बारामतीत धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरलच्या भीतीने विवाहितेचे कथित लैंगिक शोषण
एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

बारामतीत धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरलच्या भीतीने विवाहितेचे कथित लैंगिक शोषण
एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर कोल्ड ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने कथित लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी अभिषेक मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला माहेरी यात्रेसाठी गेली असताना आरोपीने कोल्ड ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्या सासरी जाऊन वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत.






