क्रीडा

विद्या प्रतिष्ठान इंदापूर मधील योगाचार्य विजय नवल पाटील यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान

अनेक वर्षापासून योगाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू

विद्या प्रतिष्ठान इंदापूर मधील योगाचार्य विजय नवल पाटील यांना ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान

अनेक वर्षापासून योगाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठान इंदापूर जिल्हा पुणे येथील योग शिक्षक योगाचार्य विजय नवल पाटील यांना 22 जून रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )तेथे देण्यात आला.

या पुरस्काराला महाराष्ट्रातील योगशिक्षक योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. श्री बाळासाहेब पवार साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे साहेब उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग) डॉ. सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉ बाबुराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉ.दिशा चव्हाण, डॉ. प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, श्री मनोहर कानडे, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

योगाचार्य विजय नवल पाटील योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मागील अनेक वर्षापासून योगाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू आहे. याचीच दखल घेत ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन हे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, सिद्ध अशा 7 चिकित्सा पद्धतींना सोबत घेऊन काम करणारे भारतातील खूप मोठे संघटन आहे.

योगाचार्य विजय नवल पाटील यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्रावरून..योगाचार्य विजय नवल पाटील यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D