आपला जिल्हा

‘सन्मान हा पदाचा नसून कार्याचा असतो’; इंदापुरात दीपक केदार यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून गौरव

सामाजिक संघटनांनी अधिक प्रभावीपणे एकत्र येण्याची गरज

सन्मान हा पदाचा नसून कार्याचा असतो’; इंदापुरात दीपक केदार यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून गौरव

सामाजिक संघटनांनी अधिक प्रभावीपणे एकत्र येण्याची गरज

इंदापूर,आदित्य बोराटे –

“सन्मान हा पदाचा नसतो, तर समाजासाठी केलेल्या कार्याचा असतो,” या भावनेतून माळशिरस येथील गोळीबार प्रकरणातील पीडिताची भेट घेण्यासाठी जात असताना दलित पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचे इंदापूर येथे सामाजिक कार्यकर्ते सुहास मखरे व मित्र परिवाराच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या संवादात समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांनी अधिक प्रभावीपणे एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सामाजिक सलोखा, संविधानिक मूल्यांचे जतन, युवकांचा सामाजिक कार्यातील सहभाग तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुहास मखरे यांनी दीपक केदार यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत समाजहितासाठी त्यांनी सातत्याने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. त्यावर बोलताना दीपक केदार यांनी अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने लढा देणे, पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. समाजहिताच्या प्रत्येक प्रश्नावर एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास ॲड आशुतोष भोसले, शुभम मखरे, चंद्रकांत सोनवणे, रोहन मखरे, गणेश लोंढे,बबलू पठाण, शहीद पठाण यांच्यासह मित्रपरिवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button