क्राईम रिपोर्ट

होंडा शाईन’ची तोडफोड; तरुणाविरोधात बारामती शहर पोलिसांत तक्रार

दहशत निर्माण केल्याची तक्रार

होंडा शाईन’ची तोडफोड; तरुणाविरोधात बारामती शहर पोलिसांत तक्रार

दहशत निर्माण केल्याची तक्रार

बारामती वार्तापत्र 

घराबाहेर लावलेल्या दुचाकीची लाथाबुक्क्यांनी तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अर्णव सचिन जगताप (रा. प्रबुद्धनगर, आमराई, बारामती) याच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारदार संदीप आबाजी देवकाते (वय ३२, व्यवसाय स्क्रॅप, रा. प्रबुद्धनगर, आमराई, बारामती) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते कुटुंबासह वडील आबाजी देवकाते यांच्या नावाच्या घरात राहतात. त्यांच्या कुटुंबाच्या वापरासाठी सत्यजित आबाजी देवकाते यांच्या नावावर असलेली होंडा शाईन दुचाकी (क्रमांक MH-42-BH-3880) वापरली जाते.
६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदार कामावरून घरी आल्यानंतर दुचाकी घराच्या बाजूला असलेल्या स्टेडियमच्या भिंतीलगत लावली होती. त्यानंतर अर्णव जगताप याने घराबाहेर येऊन परिसरातील व्यक्तीविषयी बोलत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर त्याने दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर, पुढील हेडलाइटवर, मीटर केस तसेच खोपडीच्या भागावर लाथा मारून तोडफोड केली, त्यामुळे दुचाकीचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून निघून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संदीप देवकाते यांनी अर्णव जगताप याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.

Back to top button