राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
केंद्र सरकार व ईडीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्येकर्ते एकवटणार
राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
केंद्र सरकार व ईडीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्येकर्ते एकवटणार
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्र सरकार व सक्तवसुली संचालनालयाचा ( ईडी ) निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) पुणे जिल्हाधिकारी कार्यलयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्चा काढणार आहे. याबाबत पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सहीचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून कार्येकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकात म्हंटले आहे की, केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणारे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचेशी सूडबुद्धीने केंद्र सरकारच्या ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सायंकाळी ४ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.