जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा बारामती नगर परिषद समोर उपोषणाचा इशारा
कंत्राटी कामगारांना रोजगार मिळाला तर नक्कीच गरिबी कमी होण्यास मदत होईल.

जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा बारामती नगर परिषद समोर उपोषणाचा इशारा
कंत्राटी कामगारांना रोजगार मिळाला तर नक्कीच गरिबी कमी होण्यास मदत होईल.
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या किमान वेतन,पी.एफ, इ.एस.आय.एस.व इतर मागण्यांसंदर्भात दिनांक १६/०२/२०२६ रोजी ११:०० वाजता नगर परिषद समोर अमरण उपोषण करणार आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करणार असल्याचे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सदर उपोषण बाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष बारामती नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले आहे.
बारामती नगरपरिषदेला वारंवार पत्र व्यवहार करून निवेदन देऊन देखील कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.
तसेच कामगारांचे उपोषण ठिकाणी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी शब्द दिला होता की १ महिन्याच्या आत कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवणार त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले होते.परंतु त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही.
बारामती नगर परिषद मध्ये कंत्राटी कामगारांमध्ये अनुसूचित जाती – जमाती मधील लोकांची संख्या जास्त आहे.सदर लोकांवर अन्याय करणे ,त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, कोणतेही कारण न देता कामावरून कमी करणे हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम नगर परिषद व नगरपालिका यांची कर्तव्ये व कार्य कलम ४९ (३)(अब) नागरी क्षेत्रातील गरिबी कमी करणे कर्तव्य व कार्य आहे.सदर कर्तव्याचा व कार्याचा विसर नगर परिषदेला पडला आहे.
कंत्राटी कामगारांना रोजगार मिळाला तर नक्कीच गरिबी कमी होण्यास मदत होईल.
यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,सह संघटक ओम शिंदे,सरचिटणीस सुरज वाडेकर संपर्क प्रमुख विजय आढाव,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सदस्य अनिता पवार व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.






