दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती असे नामकरण; संचालक मंडळाची एकमताने मंजुरी
बारामती बाजार समितीला मिळाले अजितदादांचे नाव; शासनाकडे प्रस्ताव सादर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती असे नामकरण; संचालक मंडळाची एकमताने मंजुरी
बारामती बाजार समितीला मिळाले अजितदादांचे नाव; शासनाकडे प्रस्ताव सादर
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण आता ‘अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती’ असे करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत
सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी,
हमाल-मापाडी यांच्या वतीने अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बारामती बाजार समितीच्या विकासात अजितदादांचे योगदान
अतुलनीय असल्याने त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सभाध्यक्ष विनायक गावडे यांनी मांडला आणि सर्वानुमते त्याला मान्यता देण्यात आली.
हा प्रस्ताव आता पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत
शासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार असून लवकरच याबाबत शासन गॅझेट प्रसिद्ध होणार आहे.