आपला जिल्हा

भिगवण प्रकरणावरून भाजप आमदार राहुल कुल वादात ,तरुणीच्या आईचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हटलं?

मुलीच्या आईनं केलेल्या आरोपांना दिलं उत्तर; नेमका विषय काय?

भिगवण प्रकरणावरून भाजप आमदार राहुल कुल वादात ,तरुणीच्या आईचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हटलं?

मुलीच्या आईनं केलेल्या आरोपांना दिलं उत्तर; नेमका विषय काय?

बारामती वार्तापत्र 

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“आरोपींना राहुल कुल हे मदत करत असून आरोपीच्या कुटुंबातील लोकांनी आपल्या मोबाईलवर राहुल कुल हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्टेटस ठेवले आहे,” असा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.

आरोपी तरुणाचा नातेवाईक असलेल्या अजहर शेख याने आज राहुल कुल यांचा फोटो स्टेटसवर ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी सांगली इथं बोलताना या आरोपींना इतकी मस्ती कुठून येते, असं म्हणत थेट अजहर शेख याचे व्हॉट्सअॅप स्टेटस मीडियासमोर दाखवत नाव न घेता आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता तरुणीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांचे नाव घेतल्याने ते वादात सापडले आहेत.

दरम्यान, भिगवण प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याने हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांबाबत अद्याप राहुल कुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Back to top button