आपला जिल्हा

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये पैशांच्या वादातून डी डी जगताप यांना हाणामारी;ठेकेदारीच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप,बारामती शहरातील आरोपी अटकेत

तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये पैशांच्या वादातून डी डी जगताप यांना हाणामारी;ठेकेदारीच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप,बारामती शहरातील आरोपी अटकेत

तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

बारामती वार्तापत्र 

माळेगाव परिसरात ठेकेदारी मिळवून देण्याच्या आमिषातून झालेल्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण होऊन डी डी जगताप यांना हाणामारीची घटना घडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते. हे आरोपी बारामती शहरातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोजूबावी येथील एका व्यक्तीस “काम मिळवून देतो”असे सांगून त्याच्याकडून पैसे घेतले होते. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे काम न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने आपले पैसे परत मागितले.सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

यामुळे संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने आपल्या ओळखीच्या काही लोकांना पैसे वसूल करण्यासाठी पाठवले. या व्यक्तींनी हाणामारी केली. या प्रकरणात बारामती शहरातील काही जणांचा सहभाग असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून, संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे. आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि मारहाण या विविध अंगांनी या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

दरम्यान,या घटनेनंतर बारामती व परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काही स्थानिकांच्या मते,अलीकडील घडामोडींनंतर कायद्याचा धाक कमी झाल्याची भावना निर्माण होत असून,परिसरात कडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून,लवकरच अधिकृत आणि सविस्तर माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Back to top button