बारामती तालुक्यातील गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पणदरे परिसरात पाहणी
तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली

बारामती तालुक्यातील गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पणदरे परिसरात पाहणी
तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील पणदरे परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, कलिंगड तसेच इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गारपिटीमुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
“शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने काम करावे,” असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांनीही तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून शासनाच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






