तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी “आधुनिक तंत्रज्ञानातील संधी” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन
दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी “आधुनिक तंत्रज्ञानातील संधी” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन
दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी “आधुनिक तंत्रज्ञानातील संधी” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानविश्वाची ओळख करून देण्याचा महाविद्यालयाचा उद्देश आहे. सेमिनारमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ञांशी थेट परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे. तसेच नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात उदयास येणाऱ्या नवीन संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी समुपदेशन सत्राचेही आयोजन करण्यात आले असून, करिअर निवडीसंदर्भात योग्य दिशा दिली जाणार आहे.
या सेमिनारसाठी नावनोंदणी आवश्यक असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी ९६०७००२२८० या क्रमांकावर संपर्क साधावा. मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन महाविद्यालय मा.प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी केले आहे.






