बारामतीतील श्री छत्रपती शाहू हायस्कूलला ‘कर्मवीर पारितोषिक’ जाहीर
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा

बारामतीतील श्री छत्रपती शाहू हायस्कूलला ‘कर्मवीर पारितोषिक’ जाहीर
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा
बारामती वार्तापत्र
बारामती येथील श्री छत्रपती शाहू हायस्कूलला रयत शिक्षण संस्थेचा अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘कर्मवीर पारितोषिक’ जाहीर झाला आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढ, स्पर्धा परीक्षांतील उल्लेखनीय यश तसेच विविध उपक्रमांतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे या विद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उल्लेख विशेष अभिमानाने केला जात आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा पुढे नेत विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपली आहे.
स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदाशिव बापूजी सातव यांनी सेवकांना वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाच्या प्रगतीला बळ मिळाले आहे. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री गणपत तावरे यांचे नियोजनबद्ध कामकाज, नेतृत्व आणि गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न या पुरस्कारामागे महत्त्वाचे ठरले आहेत.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा हा सन्मान कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या सन्मानामुळे विद्यालयाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.






