दौंड तालुक्यातील पाटसमध्ये भेसळयुक्त दूध विक्री;धक्कादायक VIDEO व्हायरल
दूध अक्षरश: सिमेंटसारखं झालं होतं.

दौंड तालुक्यातील पाटसमध्ये भेसळयुक्त दूध विक्री;धक्कादायक VIDEO व्हायरल
दूध अक्षरश: सिमेंटसारखं झालं होतं.
दौंड;प्रतिनिधि
हल्ली कशामध्ये काय भेसळ होईल याचा नेम नाही. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारला दुग्धजन्य पनीर आहे, असं हॉटेल्सला सांगण्यासाठी आदेशच काढावे लागले आहे.
अशातच आता पण्यातील दौंडमध्ये दुधामध्ये भेसळ झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. दूध अक्षरश: सिमेंटसारखं झालं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पाटसमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटस मधील युवराज आव्हाड यांनी एका स्वीट होममधून दूध विकत आणलं. घरी दूध आणल्यानंतर त्यांनी आधी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नेहमी प्रमणे त्यांनी दूध तापवण्यासाठी ठेवलं.
दूध घरी आणून तापवल्यानंतर ते खराब झालं. आव्हाड यांना वाटलं दूध फुटलं असेल. पण, जेव्हा नीट पाहिलं तर त्यामध्ये चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ तयार झाला. दुधामध्ये चक्क मोठ्यागाठी तयार झाल्याचं दिसून आलं. हा पदार्थ ओढल्यानंतर ताणला देखील जात होता. चिंगम ज्या प्रकारे ताणला जातं, तसंच या दुधासोबत होतं होतं.
आव्हाड यांनी याची माहिती आपल्या शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी येऊन पाहणी केली, तेव्हा सगळेच चकीत झााले. त्यांनी याबद्दल व्हिडीओ रेकॉर्ड केला. दुधामध्ये प्लास्टिक सारख्या गाठा तयार झाल्या होत्या. असं भेसळयुक्त दूध जर विकलं जाात असेल तर लोकांच्या शरिरावर याचा परिणाम का होणार नाही. सरकारने यावर तातडीने कारवाई करावी, अशा भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. दरम्यान, आव्हाड यांनी बद्दल सध्या कुठेही तक्रार केली नाही. पण, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.






