स्थानिक

राज्यात उन्हाचा कडाका वाढला, तापमानाचा पारा ४५ अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

काही भागात ३५ ते ४० अंशाच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे.

राज्यात उन्हाचा कडाका वाढला, तापमानाचा पारा ४५ अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

काही भागात ३५ ते ४० अंशाच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे.

बारामती वार्तापत्र

दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा  पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.

तर काही भागात ३५ ते ४० अंशाच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे. दरम्यान मुंबईत देखील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील तापमान चाळीशी नजीक पोहोचले आहे. मुंबईतील तापमानात मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. जाणून घेऊयात राज्यात कोणत्या शहरात किती तापमान आहे याबाबतची माहिती.

मुंबईतील राम मंदिर परिसरात तापमान ३९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे. सोबतच, विक्रोळीतही तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअस झाला आहे. तर वांद्रे परिसरात तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले आहे. तर मुंबईतील सांताक्रुज परिसरात ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

राज्यातील काही शहरांमधील तापमान

छत्रपती संभाजीनगर – ४३.४
मालेगांव – ४३.२
सतारा – ४१.१
जळगाव – ४४.३
रत्नागिरी – ३४
नाशिक – ४२
नवी मुंबई – ३९.२
बारामती – ४१.२
कुलाबा – ३५.४
पुणे – ४१.६
अलीबाग – ३८.२
बीड – ४३.५
नंदुरबार – ४५.३
सोलापूर – ४२.३
परभणी – ४३.२
मुंबई – ३५.८
माथेरान – ३६.६
अहिल्यानगर – ४२.२
अकोला – ४५.१
अमरावती – ४४
भंडारा – ४२
बुलढाणा – ४३.२
ब्रह्मपुरी – ४२.२
चंद्रपुर – ४१
नागपुर – ४२
वर्धा – ४३.८
वाशिम – ४२.६
यवतमाळ- ४१.४

ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा आता अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात सध्या पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

जिंतूर तालुक्यातील कौसडी, वाघी धानोरा आणि शेवडी या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांसाठी एकूण ५ टँकरने पाणी सुरू केले आहे.

त्यामध्ये कौसडी गावासाठी ३ टँकर्स तर शेवडी आणि वाघी धानोरा गावासाठी प्रत्येकी १ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी पाण्याची पातळी खालावत असून अनेक विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात टँकर सुरु केले असले तरी आगामी काळात पाणीटंचाई अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button