अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं,प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ
जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.

अखेर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं,प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ
जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकारणीच्या यादीत सत्तेचे सर्व केंद्र एकाच कुटुंबाभोवती फिरत असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले आहे. राष्ट्रवादीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला २९ एप्रिल २०२६ रोजी पत्र देण्यात आले होते.
दिग्गजांची गच्छंती
या नव्या यादीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी नेत्यांना डच्चू दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय विश्लेषकांनाही धक्का बसला आहे.
पटेल यांनी २५ वर्षांहून अधिक काळ पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः अजित पवार यांनी जेव्हा वेगळी चूल मांडली, तेव्हा पटेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. अशा निष्ठावान आणि अनुभवी नेत्याला बाजूला सारल्याने पक्षात ‘सर्व काही आलबेल नाही’ असे संकेत मिळत आहेत.
केवळ पटेलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनाही सरचिटणीस पदावरून नाव वगळण्यात आले आहे. यासोबतच छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही नवीन यादीतून गायब असल्याने, पक्षाने आपली
जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ
सत्तेचे ‘कौटुंबिक’ केंद्रीकरण?
नवीन रचनेनुसार, पक्षाची सर्वोच्च पदे पवार कुटुंबात विभागली गेल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकाच वेळी कुटुंबातील तीन सदस्यांकडे महत्त्वाची पदे गेल्यामुळे “पक्षात घराणेशाही वरचढ ठरत आहे का?” अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला असून, भविष्यातील नेतृत्वाच्या दिशेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अपरिचित चेहऱ्यांची वर्णी आणि पार्थ पवारांचा प्रभाव
धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग, डॉ. रमण प्रीत सिंग आणि डॉ. अभिषेक बोके यांचीदेखील वर्णी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर लावण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेल्या कार्यकारणीच्या यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.






