युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीतील प्रांत अधिकाऱ्यांची घेतली भेट
नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत

युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीतील प्रांत अधिकाऱ्यांची घेतली भेट
नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत युवा नेते युगेंद्र पवार यांनी प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. नागरिकांच्या अडचणी, प्रशासनाकडे प्रलंबित असलेली कामे तसेच तालुक्यातील विकासकामांच्या गतीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत बारामतीतील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
योगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, महसूल विभागातील प्रकरणे, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी काही प्रलंबित विषयांवर निवेदनही सादर केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या वाढत्या सक्रियतेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर ते सातत्याने पुढाकार घेत असल्याने बारामतीच्या राजकारणात त्यांच्या हालचालींकडे लक्ष वेधले जात आहे.
त्यामुळे आगामी काळात बारामतीच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






