बारामती वनविभागाची धडक कारवाई;विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त-वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे
विनापरवाना तोडलेले अंदाजे ८ ते ९ टन

बारामती वनविभागाची धडक कारवाई;विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त-वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे
विनापरवाना तोडलेले अंदाजे ८ ते ९ टन
बारामती वार्तापत्र
मौजे रुई गावच्या हद्दीत बारामती-भिगवण रोडकडून बारामती एमआयडीसी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक कारवाई करुन विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वअश्विनी शिंदे यांनी दिली आहे.
पारवडीचे वनरक्षक संतोष जराड व हंगामी रोजंदारी मजूर यांच्या पथकाला टाटा कंपनीचा पांढऱ्या क्रीम रंगाचा एक टेम्पो संशयास्पदरित्या आढळून आले ; चौकशी केली असता टेम्पोमध्ये कडूनिंब व जांभूळ वृक्ष प्रजातीचे विनापरवाना तोडलेले अंदाजे ८ ते ९ टन मुद्देमाल विना वाहतूक परवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. मुद्देमालसह टेम्पो पुढील चौकशीकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले.
वाहन चालक फरार झाला असून वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२ व ५२ (१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस.आर.उंडे, संतोष जराड वनरक्षक करीत आहे.






