आपला जिल्हा

सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तत्काळ अग्निशामक उपलब्ध करुन दिल्यामुळे आग आटोक्यात..

सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तत्काळ अग्निशामक उपलब्ध करुन दिल्यामुळे आग आटोक्यात..

इंदापूर  –

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे शनिवारी (दि.1) सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सिमेंटच्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरवरील ब्लोअर तसेच अग्निशामक यंत्रांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सिमेंट टँकर सोलापूरहून पुण्याकडे जात असताना सरडेवाडी परिसरात अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने वाहनाचा मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ट्रॅक्टरवरील ब्लोअर व नगरसेवक अजिंक्य जावीर यांनी तत्काळ अग्निशामक उपलब्ध करुन दिल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती व कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D