आपला जिल्हा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या प्रचारासाठी संतोष जुवेकर बारामतीत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेल्फी, ऑटोग्राफ आणि एक झलक पाहण्यासाठी तरुणाईने एकच जल्लोष केला.

बारामती‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या प्रचारासाठी संतोष जुवेकर बारामतीत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेल्फी, ऑटोग्राफ आणि एक झलक पाहण्यासाठी तरुणाईने एकच जल्लोष केला.

बारामती वार्तापत्र 

लोकप्रिय मराठी अभिनेता संतोष जुवेकर याच्या एका भेटीने गुरुवारी बारामतीत अक्षरशः उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या प्रचारासाठी बारामतीत दाखल झालेल्या जुवेकर यांच्या स्वागतासाठी चित्रपटगृह परिसरासह शहरातील प्रमुख चौकांमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

सेल्फी, ऑटोग्राफ आणि एक झलक पाहण्यासाठी तरुणाईने एकच जल्लोष केला.

चित्रपटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावलेल्या संतोष जुवेकर यांनी चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटाच्या चित्रीकरणातील काही रंजक आणि मजेशीर किस्से सांगत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठी चित्रपटांना कायम साथ देणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानत, “कुटुंबासह चित्रपटगृहात जाऊन ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट नक्की पाहा,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी चाहत्यांनी अक्षरशः एकच गर्दी केली होती. अनेकांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबाबत प्रश्न विचारले. प्रत्येक चाहत्याला वेळ देत जुवेकर यांनी प्रेमाने संवाद साधल्याने उपस्थितांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

बारामतीतील या दौऱ्यामुळे मराठी चित्रपटप्रेमींमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची चर्चा रंगू लागली आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक आयोजक, चित्रपट वितरक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने मराठी चित्रपटप्रेमी उपस्थित होते. अखेरीस सामूहिक छायाचित्र आणि चित्रपटाला शुभेच्छा देत कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.

Back to top button