क्राईम रिपोर्ट

बारामतीत ८ आणि ५ वर्षीय दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार

५९ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा

बारामतीत ८ आणि ५ वर्षीय दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार

५९ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी देविदास नारायण शिवदे (वय ५९, रा. कुंभार गल्ली, लक्ष्मीआई मंदिराजवळ, कसबा, बारामती) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास नारायण शिवदे (वय ५९, रा. कुंभार गल्ली, लक्ष्मीआई मंदिराजवळ, कसबा, बारामती) याने जून २०२६ दरम्यान (नेमकी तारीख अज्ञात) आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत दोन अल्पवयीन मुलींना शेजारील जुन्या घरात नेल्याचा आरोप आहे.

तेथे त्यांच्याशी कथितरीत्या लैंगिक स्वरूपाचा गैरवर्तन केल्याचा तसेच स्वतःला स्पर्श करण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस कलम ७४, ७५, पोक्सो कायद्याच्या कलम ८, ९(m), १० तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)(w)(i)(ii) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांनी कामकाज पाहिले असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button